10th Job12th BoardLetest NewsSSC ExamTime Tableवर्तमान भरती:2020

💥 मोठी बातमी..! दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच; अर्धा तास वेळ अधिक मिळणार

 

🎓 कोरोनाकाळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार याविषयी संभ्रम असतानाच या परीक्षा आता ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

👉 यासोबतच गेल्या वर्षभरात ऑनलाईन शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळे परीक्षार्थींना अर्धा तास वाढीव वेळ दिला जाणार आहे.

🧐 शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या..:

🗣️ _महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत, मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे._

🗣️ _वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. हि बाब लक्षात घेऊन दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींना अर्धा तास वाढीव वेळ देण्यात येईल._

✍️ दरम्यान, अर्धा तास वाढीव वेळ दिल्यामुळे परीक्षा आता साडे तीन तासांची असणार आहे. तसेच ऑफलाईन परीक्षा होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आता याविषयीचा संभ्रमदेखील दूर झाला आहे.

🎯 _हि माहिती नक्की शेअर करा..!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button