🏫
✍️ व्हाट्सअॅपवर सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये दहावीची परीक्षा 7 मार्च ते 25 मार्च असेल असा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर या मेसेजमध्ये 7 मार्च ते 25 मार्चपर्यंतचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान होणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, हा दावा खोटा आहे हे स्पष्ट झाले आहे.
❗ दोन दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत मोठं विधान केलं आहे. त्यानुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणे शक्य नाही हे सिद्ध होते. दहावी बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल’, असं वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं आहे.