12th BoardLetest News

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, असा असणार 11 वी प्रवेश परीक्षेचा फॉर्मुला

कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.

● त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जुलै महिन्यात लावण्यात येईल आणि अकरावीच्या प्रवेशासाठी CET घेण्यात येईल अशी घोषणा केली होती.

● त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या CET परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे.

● जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे.

जाणून घ्या प्रवेश परीक्षा कशी होणार याबाबत…

● CET प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे.
● विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाऊन ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
● ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.
● एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार असून एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.
● यात इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रश्न असणार आहे.
● परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे.
● परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे.
● या परीक्षेतील गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.
● दहावीच्या परीक्षेचं शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांकडून CET साठी शुल्क आकारण्यात येणार नाही.

 

● इतर विद्यार्थ्यांचे काय होणार?

जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छित नाही, त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यांचं मूल्यमापन हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे.

Related Articles

Back to top button