
मोठी घोषणा! पहिली ते आठवी परीक्षा रद्द; शिक्षणमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे सांगत, या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगतलं आहे.
वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?
राज्यात कोरोनाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. पहिली ते आठवी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल यामाध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवलं.
खरतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरु झाल्या नाहीत. तर पाचवी ते आठवी या शाळा सुरु झाल्या. पण काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता.
पण सध्या कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी होण शक्य नाही.
राज्यातील जे पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे.
We stumbled over here by a different web address and thought I might check things out.
I like what I see so i am just following you.
Look forward to exploring your web page for a second time.
of course like your website but you have to take a look at the spelling on several of your
posts. Many of them are rife with spelling issues and I in finding it very bothersome to inform the reality
then again I will surely come again again.
Keep on writing, great job!