Astrology

💁‍♂ आजचे राशिभविष्य; 29 जून 2020 Astrology

💁‍♂ आजचे राशिभविष्य; 29 जून 2020

आजचे राशिभविष्यJobmarathi | Astrology

1. *मेष* : केलेल्या कामातून समाधान मिळेल. योग्य तर्क वापरता येईल. आपले विचार चलाखीने मांडाल. 

2. *वृषभ* : गोड बोलण्यावर अधिक भर द्याल. सांपत्तिक दर्जा सुधारेल. कमिशनमधून चांगली कमाई होईल. 

3. *मिथुन* : बौद्धिक हटवादीपणे वागणे राहील. तत्परतेने कामे करण्यावर भर द्याल. जबाबदारीचा एकंदर आवाका लक्षात घ्यावा.

4. *कर्क* : सरकारी कामात अधिक वेळ जाईल. मनातील निराशाजनक विचार दूर करावेत. आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शनाखाली करावी. 

5. *सिंह* : तरूणांशी मैत्री कराल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यावा. वरिष्ठांच्या संपर्कात राहाल. चारचौघांत तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल. 


6. *कन्या* : आपल्या आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. बुद्धिचातुर्याने कामे करण्यावर भर द्याल. व्यवहारात चतुरता दाखवून द्याल.

7. *तूळ* : अत्यंत कुशलतेने वागाल. तुमच्या वक्तृत्वावर लोक प्रभावित होतील. प्रवासाची आवड पूर्ण होईल. 

8. *वृश्चिक* : कफ विकाराचा त्रास संभवतो. मनातील इच्छेला मुरड घालू नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.

9. *धनु* : तुमचा बौद्धिक कस लागू शकतो. मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराविषयी मनात गैरसमज बाळगू नका.

10. *मकर* : इतरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा. वादाच्या मुद्दयात सहभाग घेऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. 

11. *कुंभ* : तुमचे बुद्धी-कौशल्य पणाला लागू शकते. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा.

12. *मीन* : गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. 

📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच जॉइन करा आमचा ग्रुप*
👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/ECz0dXGsRt09wfFPFxFSTH

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button