🗓️ दरमहा पहिल्या तारखेला आर्थिक बाबींमध्ये बदल होत असतात. त्यानुसार १ ऑगस्टपासून (उद्यापासून) काही नियम बदलणार आहेत. त्यात काही नियमांचा फायदा होईल, तर काही नियमांमुळे खिसा खाली होणार आहे.
💰 सुट्टीच्या दिवशीही होणार पगार
आतापर्यंत पगाराच्या दिवशी शनिवार, रविवार वा सार्वजनिक सुट्टी आली, तरी पगार पुढे ढकलला जात होता. मात्र, आता तसे होणार नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार, आता सातही दिवस खात्यात पगार, पेन्शन, डिव्हिडंट आणि इंटरेस्टचे पैसे जमा होणार आहेत.
🏪 नॅच’च्या (NACH) नियमांत बदल
नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस, अर्थात ‘नॅच’च्या नियमांतही रिझर्व्ह बँकेने बदल केले आहेत. त्यानुसार, आता 1 ऑगस्टपासून आठवडाभर 24 तास ही सेवा मिळणार आहेत.
💵 ‘आयपीपीबी’ आकारणार शुल्क
इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात ‘आयपीपीबी’तर्फे आता 1 ऑगस्टपासून डोअरस्टेप बँकिंगसाठी प्रति कस्टमर 20 रुपये प्रति रिक्वेस्ट शुल्क आकारले जाणार आहे.
🏦 ‘आयसीआयसीआय’च्या नियम बदलले
‘आयसीआयसीआय’ बँकेच्या ग्राहकांनी एटीएममधून 4 पेक्षा जास्त वेळा ट्रान्झॅक्शन केल्यास अधिक शुल्क द्यावे लागेल. तसेच वर्षाला 25 पानांपेक्षा मोठ्या चेकबूकसाठी 20 रुपये प्रति 10 पानांना द्यावे लागणार आहेत.
🏧 एटीएम ट्रान्झॅक्शनवर शुल्कात वाढ
‘आरबीआय’ने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये शुल्क केले आहे.
⛽ गॅस सिलेंडरच्या नव्या किंमती
1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या नव्या किंमती जारी होतील. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या किंमती निश्चित होत असतात.