Letest News

विंचवाच्या विषाची किंमत कोटींमध्ये आहे.

जेव्हा विज्ञान पूर्णपणे विकसित झाले नव्हते, तेव्हा मनुष्य झाडे-झुडपे आणि जडी-बुटीने आपला उपचार करत होते. पण आता विज्ञानाच्या मदतीने या कामाला सोपे बनवले गेले आहे. मनुष्याच्या शरीरात आजकाल अनेक नवीन आजार आहेत, ज्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना प्राण्यांची मदत होत आहे. असे म्हणतात ना, या जगात मिळणारी प्रत्येक वस्तू किमती आहे, म्हणूनच तर विषाची किंमत कोटींमध्ये आहे.

तसे तर विष कोणालाही सहज मृत्यूच्या जाळ्यात ओढू शकते. परंतू जर याचा वापर चांगल्या पद्धतीने केला गेला तर हे विष हजारो लोकांचे आयुष्य वाचवू शकते. त्यामुळेच विषाची गणना जगातील सर्वात महाग द्रव पदार्थांत केली जाते.आज आमही तुम्हाला अशाच एका विषारी जिवाबद्दल सांगणार आहोत, ज्याचे विष मनुष्यासाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही.
कोणाचे विष आहे इतके किंमती
ही गोष्ट आहे विंचवाची, हा जीव इतका खतरनाक असतो की, याच्या विषाचा एक थेंब मनुष्याचे मोठे नुकसान करतो. इतकेच नाही तर मनुष्याचा जीव जाऊ शकतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की विंचवाचे विष पृथ्वीवर मिळणारे सर्वात महाग द्रव आहे.

विंचु याचा वापर आपल्या शिकाराला पकडण्यासाठी अथवा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी करतात. इतकेच नाही तर मनुष्य जीवनासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.
आता तुमच्या मनात प्रश्न येत असतील की याच्यात कोणती खास गोष्ट आहे, ज्यामुळे हे विष इतके महाग आहे. विंचवाच्या विषात अधिक प्रमाणात प्रोटिन्स असल्यामुळे हे अनेक प्रकारच्या औषधांमध्ये वापरले जाते. ज्यामुळे संधिवात, बाय आणि पचन यंत्राच्या आजारांवर उपचार म्हणून उपयोगी पडते.

त्याचे विष कसे काढले जाते?
विंचु विषाच्या या वैशिष्ट्यामुळे हे जगातील सर्वात महाग द्रव मानले जाते. त्याचे विष अशाप्रकारे काढले जाते की, यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही. त्याच्या स्टिंगमध्ये लहान विद्युत शोक दिला जातो. त्यामुळे मोठ्याप्रमाणात विष बाहेर पडते. विष काढताना मनुष्याचा मृत्यू होण्याचा धोका देखील आहे. म्हणून यात मोठी काळजी घेणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत इतकी जास्त आहे की हे कोणीही विकल्यास लक्षावधी होऊ शकतो. विंचवाच्या विषात पाच लाख असे केमिकल कंपाउंड समाविष्ट आहेत, ज्यावर आजून संशोधन झालेले नाही. त्यामुळे याला ‘कॉकटेल ऑफ बायोऍक्टिव कंपाउंड’ म्हंटले जाते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button